। सुकेळी । वार्ताहर ।
डॉक्टर्स डे निमित्ताने करुनी रक्तदान वाचवुया रुग्णांचे प्राण या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी जपत रोहा तालुका चॅरिटेबल मेडिकल असोसिएशन यांच्या वतिने शुक्रवारी (1 जुलै )डॉ.भोईर यांच्या निवासस्थानी , शिहु (मुढांणी फाटा) येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपल्या अमुल्य अशा रक्ताने एखाद्याचे प्राण वाचावे अशी भावना मनात ठेऊन रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी डॉ.पुरूषोत्तम भोईर (मो.न. 9421168177 ) यांच्याशी संपर्क साधावा.