प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत नाईक मित्रमंडळाकडून बुधवार (दि.23) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे.

रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीमध्ये गत काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी यांनी केले आहे.

दरम्यान, कच्छी भवन, श्रीबाग येथे सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी रवी थोरात 9850564505, कपिल अनुभवणे 9168234885, संजय कांबळे 8793368100 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version