प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत नाईक मित्रमंडळाकडून बुधवार (दि.23) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सहकार्य लाभणार आहे. कच्छी भवन, श्रीबाग येथे सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी रवी थोरात 9850564505, कपिल अनुभवणे 9168234885, संजय कांबळे 8793368100 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version