| पनवेल | वार्ताहर |
घणसोली डी मार्ट पोलीस चौकीजवळ एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध रबाळे पोलीस करीत आहेत. ह्या अनोळखी इसमाचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे, अंगावर काळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची फुल पॅन्ट, डोक्यावरील केस काळे पांढरे, दाढी मिशी बारीक काळी पांढरी, उंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, निम गोरा आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने रबाळे पोलीस ठाणे किंवा सहा.पो.नि.वृषाली पवार मो.नं.9890689894 येथे संपर्क साधावा.