पनवेलमध्ये सापडले अनोळखी इसमाचे मृतदेह

बांधकाम साईटवर मृतदेह

| पनवेल | वार्ताहर |

शहरातील एका बांधकाम साईटवर एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. सत्यम शिवम सुंदरम या इमारतीच्या बांधकाम साईटवर सारस्वत बँकेच्या बाजूला एका 35 ते 40 वयोगटातील इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याचे नाव संजू (पूर्ण नाव माहित नाही) असे आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक अनिल राजुरे यांच्याशी संपर्क साधावा.

कोळेश्‍वर मंदिर परिसरात मृतदेह

शहरातील कोळेश्‍वर मंदिराच्या बाजूला एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. शहरातील कोळेश्‍वर मंदिराच्या बाजूला एका 35 ते 40 वयोगटातील अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र 022-27452333 किंवा पोलीस उपनिरीक्षक अनिल राजुरे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version