| नाशिक | वृत्तसंस्था |
नाशिक-दिंडोरी मार्गावर आज (दि.5) दुपारच्या सुमारास बोलेरो कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. ढकांबे गावाजवळ ही घटना घडली आहे. या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अपघातांच्या घटनेत वाढ होत आहे. आता नाशिक-दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ बोलेरो गाडी आणि दुचाकीची जोरदार धडक झाली असून अपघातात पाच जण ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरो गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात येत आहे.






