अंजप केंद्रात स्तनपान सप्ताह

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या अंजप आरोग्य उप केंद्रात स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आला. या सप्ताहात सर्व स्तनदा मातांना स्तनपानाचे महत्व समजून सांगितले जात आहे. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभाफेरी काढून स्तनपानाचे महत्व सांगणारी फलक हाती घेतले होते. स्तनपान सप्ताह निमित्त आंबिवली कर्जत येथील आयुष्मान आरोग्य मंदिर आंजप प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनपान संबंधि जनजागृतीसाठी गावात फेरी काढण्यात आली. तसेच, युनायटेड वे संस्थेच्या सदस्यांनी या ठिकाणी पथनाट्य सादर केले. यावेळी उपस्थितांना स्तनपानाचे महत्व, गरज, समज-गैरसमज, सकस आहार आदी विषयी माहीती देण्यात आली.

Exit mobile version