लाचलुचपत विभागाची कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अंमली पदार्थ विरोधी पथकातील दोन पोलीस कर्मचार्‍यांनी पान मसाला विक्रेत्याकडे गुटखा व पान मसाल्याचा धंदा सुरु ठेवण्यासाठी दरमहा 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये पोलीस शिपाई बाबासाब मधु सांगोलकर व पोलीस हवालदार इक्बाल बशिर शेख या दोघांचा समावेश असून हे दोघेही नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत आहेत.

Exit mobile version