जिल्हा अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गायकवाड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारतीय बौध्द महासभा रायगड उत्तर शाखेची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर गायकवाड, सरचिटणीसपदी राजेश भालेराव आणि जिल्हा कोषाध्यक्षपदी राजेंद्र बावस्कर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, संस्कार उपाध्यक्षपदी प्रकाश सोनावणे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्षपदी विजय कांबळे, संरक्षण उपाध्यक्षपदी राहूल कांबळे, हिशोब तपासणीस संदीप गाढे, कार्यालयीन सचिव महेंद्र निकाळजे, संस्कार सचिवपदी गणेश कांबळे, संस्कार सचिवपदी संतोष जाधव, प्रचार व पर्यटन सचिवपदी प्रमोद जाधव, प्रचार व पर्यटन सचिवपदी रविकांत जाधव, संघटकपदी सिध्दार्थ गायकवाड, पुंजाजी तायडे, दिपक कांबळे, बंडू कदम यांची निवड जाहीर करण्यात आली. मान्यवरांनी अर्जांची पडताळणी करून पदांची निवड केली आहे. यावेळी राष्ट्रीय सचिव बी.एच. गायकवाड, महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु.जी. बोराडे, राज्य पर्यटन उपाध्यक्ष सुनंदा वाघमारे, राज्याचे माजी सरचिटणीस सुशील वाघमारे, राज्य संस्कार सचिवा संपदा चव्हाण, संरक्षण सचिवा रमा गांगुर्डे, रायगड जिल्हा महिला अध्यक्षा उषा कांबळे आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातील व तालुक्यांमधील पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.