| पनवेल | वार्ताहर |
बेलापूर येथे एका भटक्या कुत्र्याला कोणीतरी मारहाण केल्याने तो मरणासन्न अवस्थेत पडलेला होता. हे लक्षात येताच बेलापूर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार वैभव माळी यांनी तात्काळ त्या जखमी कुत्र्याला प्राण्यांच्या डॉक्टरकडे नेले. या कुत्र्याची परिस्थिती फार गंभीर होती. डॉक्टरांनी त्याच्यावर तात्काळ उपचारास सुरुवात केली. मात्र, घाव खूप गंभीर असल्याने ते भरुन येण्यास खूप कालावधी लागणार होता. परंतु, वैभव माळी यांनी डॉक्टरांस तो पुर्ण बरा होईपर्यंत उपचार करणार असल्याचे सांगितले होते. एक महिन्यानंतर तो कुत्रा संपूर्णपणे बरा झाला आहे.