बसच्या धडकेने म्हैशीचा मृत्यू

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगावपासून दोन किमी अंतरावर असणार्‍या निळगुण फाटा येथे माणगाव दिघी पोर्ट राज्य महामार्गावरील रस्त्यावर बसच्या अज्ञात चालकाने म्हैशीला समोरून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात म्हैस जागीच मृत्यूमुखी पडली. सदरील अपघात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत बाबु केरू पाखुर्डे रा. मांगवली ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बाबु पाखुर्डे यांच्या मालकीची काळ्या रंगाची म्हैस हिला दिघी पोर्ट ते माणगाव अशा जाणार्‍या खासगी बस क्र. एमएच 48 के -0741 या गाडीवरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील बस ही अतिवेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून समोरून म्हैशीला जोरदार ठोकर मारून अपघात केला. या अपघातात म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बसचा चालक अपघात ठिकाणाहून पोलिसांना माहिती न देता पळून गेला. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version