हा भार सोसवेना…

दोन मुद्रांक विक्रेत्यांवर कर्जत तालुक्याचा भार; नागरिकांची प्रचंड गैरसोय

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तहसील कार्यालयात सध्या केव्हा दोनच अधिकृत असे मुद्रांक शालूक विक्रेते आहेत. त्यामुळे शासकीय कामासाठी आवश्यक असलेले मुद्रांक हे विकण्यासाठी शासनाने नियुक्त केलेले मुद्रांक विक्रेते यांची कमतरता भासत आहे. मुद्रांक विक्रेत्यांच्या कमतरतेमुळे शासकीय कामासाठी येणार्‍यांची मोठी गैरसोय होत असुन शासनाने लवकरच नवीन मुद्रांक विक्रेत्यांना परवाना देऊन ही अडचण दूर करण्याची मागणी होत आहे.

तालुक्यातील 200 हून अधिक गावातील आणि त्याहून अधिक आदिवासी वाड्यांमधून लोक आपल्या शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात पोहचत असतात. त्यात शालेय आणि महाविद्यालयीन कामासाठी विद्यार्थी यांना शासकीय कार्यालयात मिळणारे मुद्रांक आवश्यक असते. त्यात कर्जत तालुक्यातील जमीन आपली व्हावी यासाठी जमिनीचे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असते. त्यासाठी येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयामध्ये नेहमीच गर्दी पाहावयास मिळते. शालेय विद्यार्थ्यांना तसेच सर्व नागरिकांना शपथपत्र तथा इतर खाजगी कामांकरीता स्टॅम्प पेपरची गरज लागते. यासाठी कर्जत तहसील कार्यालयात एकूण बारा मुद्रांक विक्रेते कार्यरत होते. काही वर्षात त्यापैकी शासन परवाना धारक असे पाच मुद्रांक विक्रेते यांचे निधन झाले आहे. त्यामुळे ते लायसन्स बाद झाले आहेत. तर तीन मुद्रांक विक्रेते यांनी आपले परवाने रायगड जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडून नूतनीकरण करून घेतले नाहीत. त्याचवेळी तीन मुद्रांक विक्रेते यांनी आपले काम काही वर्षांपूर्वी थांबवले आहे. त्यामुळे सध्या कर्जत तालुक्यसाठी केवळ दोनच मुद्रांक विक्रेते आहेत. मोरे आणि गायकवाड असे दोनच अधिकृत आणि शासनाने परवाने दिलेले मुद्रांक विक्रेते कर्जत तालुक्यात कार्यरत आहेत.

त्या दोन्ही मुद्रांक विक्रेते यांच्याकडून कर्जत तहसील कार्यालयात कार्यलयीन वेळेत मुद्रांक यांची विक्री केली जाते. मात्र तरी देखील कर्जत तालुक्याचा पसारा लक्षात घेता आणि कर्जत तालुक्यात सध्या सुरु असलेले जमीन खरेदीचे व्यवहार सर्वात आघाडीवर आहेत. त्यामुळे कर्जत तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते यांच्या कार्यालयाबाहेर रांगा लागलेल्या दिसून येतात. त्यात शाळा महाविद्यालये यांच्यासाठी आवश्यक असलेले मुद्रांक विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तालुक्यातील काही ठिकाणी खासगी स्वरूपात मुद्रांक यांची विक्री होत आहे. मात्र शासनाचे परवाने कर्जत तहसील कार्यलयाबाहेर मोरे आणि गायकवाड यांच्याकडे असल्याने अन्य ठिकाणी मिळणारे मुद्रांक विकत घ्यायचे काय? हा देखील प्रश्‍न काहीसमोर आहे. त्याचवेळी खासगी ठिकाणी मिळणारे मुद्रांक हे अधिक किंमत आकारून विकत घ्यावे लागतात आणि त्यामुळे ती समस्या देखील विद्यार्थी वर्गसाठी आर्थिक अडचणीची ठरत आहे.

मुद्रांक विक्रेते रविंद्र हजारे आणि विलास मुरकुटे यांचा दोन वर्षांपुर्वी आजारपणामुळे मृत्यु झाला. त्यानंतर त्यांचा परवाना त्यांच्या वारसांच्या नावावर होण्याकरता त्यांनी अलिबाग येथील जिल्हा अधिकारी यांच्याकडे विनंती अर्ज केला आहे.परंतु, त्या अर्जावर अद्याप कुठलाही निर्णय न झाल्याने त्यांच्या परवान्याचे नुतनीकरण होऊ शकले नाही अशी माहिती मिळत आहे. त्याचवेळी तालुक्यात खासगी ठिकाणी सुरु असलेल्या विक्रीवर शासनाने निर्बंध आणायला हवेत.

दिगंबर चंदने
नागरिक
Exit mobile version