बोरीस येथे घरफोडी

35 हजाराचा माल लंपास
। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग येथे काही दिवसांपूर्वीच अनेक घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या असून आता पुन्हा एकदा कनकेश्‍वर फाट्याजवळील बोरीस गावात घरफोडी झाली आहे. मौजे बोरीस, कनकेश्‍वर फाटयाच्या जवळ दि. 04 नोव्हेंबर ते 05 नोव्हेंबर च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी रा.बोरीस, कनकेश्‍वर फाटयाच्या जवळील घराच्या उघडया खिडकीतून शिरून फिर्यादी यांच्या बेडरूममधील कपाटातून व हॉलमधील टेबलच्या खणातून रोख रक्कम व सोन्याचे दागीने असे एकुण 35 हजार 900 रूपये किमतीचा माल चोरून नेला. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोसीई/श्री.कावळे हे करीत आहेत.

Exit mobile version