। अलिबाग । वार्ताहर ।
24 ऑक्टोबर रोजी पेणमध्ये घरफोडी झाली. दि.23 ते 24 ऑक्टोबरच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी रा.मुंढाणी पो.बेणसे ता.पेण यांच्या राहत्या घराच्या बेडरूममधील बंद खिडकीवाटे आत प्रवेश करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 54 हजार 700 रुपये किमतीचा माल घरफोडी करून चोरून नेला. याबाबत नागोठणे पोलीस ठाणे येथेे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई/श्री.भिसे हे करीत आहेत.