। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
पावस तालुक्यातील खानवली ते रत्नागिरी या एसटी बसला पावस भक्तनिवासजवळ ताबा सुटल्याने अपघात झाला आहे. सुदैवाने गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. सकाळी सातच्या सुमारास खानवली-रत्नागिरी ही वस्तीची गाडी (एमएच-14-बीटी-2685) शालेय विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली. पावस भक्तनिवासजवळील गतिरोधकावरून गाडी आपटू नये यासाठी चालकाने गाडी बाजूने नेत असताना गाडी रस्ता सोडून बाजूला गेली. सुदैवाने त्या ठिकाणी असलेल्या सिमेंटच्या खांबाला धक्का देऊन गाडी चिखलामध्ये थांबली. त्यामुळे प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. त्यानंतर प्रवाशांना दुसर्या गाडीने मार्गस्थ करण्यात आले.
पावस येथे बसला अपघात
