। महाड । प्रतिनिधी ।
कोंझर घाटामध्ये एका अवघड वळणावर गाडी उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने गाडी तीस फूट सरळ खाली कोसळली. सुदैवाने बसमधील 44 प्रवासी सुखरूप आहेत.
सुट्टीचे दिवस असल्याने ऐरोली नवी मुंबई येथून किल्ले रायगडावर गेलेले प्रवासी परतत असताना कोंझर घाटामध्ये अवघड वळणावर सुमारे तीस फूट खाली बस कोसळली. हा अपघात रविवारी (दि.15) सायंकाळच्या सुमारास घडला. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने बसमधून प्रवास करणारे 44 प्रवासी सुखरूप आहेत. प्रवाशांमध्ये महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश होता.
अपघात झाल्याचे समजताच कोंझर गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आणि तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. तसेच, पोलीस प्रशासन आणि रुग्णवाहिका तसेच रेस्क्यू पथक देखील दाखल झाले होते. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते त्यांना प्रथम उपचार करून पुढील प्रवास करण्यासाठी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि आ.भरत गोगावले यांनी पुढील प्रवास करण्यासाठी व्यवस्था केली.