व्यावसायिकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

। मुंबई । प्रतिनिधी ।

मुंबईत भेंडी बाजारातील एका व्यावसायिकाने आपल्या कार्यालयातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. व्यवसायात सतत तोटा होत असल्याने आर्थिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

इक्बाल मोहम्मद सिवानी (52) हे व्यवसायात सतत तोटा होत असल्याने तणावाखाली होते. शुक्रवारी (16) रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी त्यांच्याच कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. यावेळी कार्यालयातील इतर कर्मचारीही तिथे उपस्थित होते. इक्बाल मोहम्मद सिवानी यांच्या आत्महत्येमागे कर्ज हेच कारण होते की आणखी काही कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version