चेअरमनपदी सी.एम. ठाकूर बिनविरोध

| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील बोर्ली-मांडला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी सी.एम.ठाकूर यांची सलग पाचव्यांदा निवड करण्यात आली, तर व्हाईस चेअरमनपदी भारती बंदरी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून श्रीकांत पाटील यांनी काम पाहिले. संस्थेचे सचिव मधुकर ढेबे, माजी सभापती रमेश नागावकर, मांडला सुदर्शन सहकारी भात गिरणी संघाचे चेअरमन शशिकांत पारवे, काकळघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष कांबळी, शेकापचे पुरोगामी युवा संघटनेचे शरद चवरकर, मंगेश थळे, विनायक चोगले, स्वस्तिक ठाकूर, स्नेहल थळे, संतोष देऊळकर, दीपक पाटील यांसह उपस्थितांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version