नकली दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोग

। ठाणे । प्रतिनिधी ।
सध्या महाराष्ट्रात सण -उत्सवाचे दिवस सुरु असून या काळात मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढते, अनेक नागरिक आपल्या घराजवळील दुकानांमधून मिठाई व इतर पदार्थ विकत घेत असतात पंरतु हे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी असली दुधाचा वापर झाला आहे का याबाबत त्याना माहिती नसते.

मुंबई व लगतच्या शहरांमध्ये नकली दूध बनविणार्‍या टोळ्या कार्यरत असून पोलीस व सरकारी यंत्रणा यांच्यावर योग्य ती कारवाई करत असते परंतु या सर्व प्रकारांमुळे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड सांगतात, दुधामध्ये फक्त पाण्याचीत भेसळ होते असे नाही, तर त्यात त्याहूनही अधिक घातक पदार्थ मिसळले जातात. लोणी,तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी दुधातून मलई काढून घेतली जाते. त्यामुळे दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण कमी होते, रासायनिक पदार्थांची सर्रासपणे भेसळ केल्यामुळे किडनीचे आजार व कर्करोगाचा धोका वाढतो. भारतात आज 25 ते 30 लाख कर्करुग्ण आहेत. दरवर्षी यात 12 लाखांची भर पडते.

दरवर्षी सात लाख रुग्णांचा यामुळे जीव जातो त्यामुळे आपण भेसळयुक्त अन्न अथवा दुग्धजन्य पदार्थांपासून कसे मुक्त राहू यावर मंथन करणे गरजेचे आहे. आता सरकारी नियमाप्रमाणे मिठाईवर सुद्धा समाप्त तारीख लिहिणे गरजेचे आहे पंरतु अनेक नागरिक यावर लक्ष देत नाहीत व पैसे देऊन आजार विकत घेतात.

Exit mobile version