कारची दोन दुचाकींना धडक; 5 जण जखमी

| माणगाव | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावर कारची दोन दुचाकांनी ठोकर लागून झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित मुंढे (21) हे रविवारी (दि.22) रात्री पावणेबाराच्या सुमारास स्कुटीवरून चुलत भावासोबत गोवा-मुंबई महामार्गावरुन त्यांच्या दाखणे गावाकडे जात होते. ते नाणोरे गावानजीक असलेल्या एचपी पेट्रोल पंपजावळ आले असता त्यांच्या समोरुन येणऱ्या नेक्सा कार चालक अमित मेहता (43) यांचे कारवरील नियंत्रण सुटले व दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत स्कुटीवरील रोहित मुंढे व त्यांचा चुलत भाऊ हे दोघेही जखमी झाले. तसेच, त्यांच्या पाठीमागुन येणाऱ्या मोटारसायकलची स्कुटील धडक बसल्याने त्यावरील तिघेजणदेखील जखमी झाले. त्यामुळे या अपघातात दोन्ही दुचाकींचे आणि कारचे नुकसान झाले असून एकूण 5 जण जखमी झाले आहेत.

Exit mobile version