स्वेरीतर्फे करिअर गाईडन्स सत्राचे आयोजन

। पंढरपूर । प्रतिनिधी ।
गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तर्फे विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रविवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी करिअर गाईडन्स सत्राचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये स्वेरीचे संस्थापक सचिव तथा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बारावी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण असणार्‍या विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून या महत्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे मार्गदर्शन सत्र सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले असून, www.facebook.com/svericampus/live/ या लिंकच्या सहाय्याने सहभागी होतो येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुसर्‍या वर्षी देखील लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी व पालकांच्या मनात प्रवेशासंबंधी विविध प्रश्‍न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी त्यांचा होणारा संभ्रम व अडचणी लक्षात घेवून अभियांत्रिकी व व्यावसायिक शिक्षणातील प्रदीर्घ अनुभव असणारे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर यांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, कॅप राऊंडस, विविध शाखांची निवड, प्रवेश प्रक्रिये दरम्यान घ्यावयाची काळजी, विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आदीबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, या दृष्टीने खास विद्यार्थी व पालकांसाठी या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी या मार्गदर्शन सत्राचा विद्यार्थी व पालकांनी अवश्य लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (9168655365) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील आवाहन संस्थेतर्फे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी केले आहे.

Exit mobile version