| जालना | प्रतिनिधी |
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथे शेततळ्यात बुडून तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या घटनेत सक्खे भाऊ-बहिण आणि चुलत भाऊ असे मृत्यूमुखी पडले आहेत.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील तीन चिमुकली मुले सोमवारी गायब झाली होती. दरम्यान मंगळवारी (दि. 03) सकाळी कोनड रोडवरील त्यांच्या शेतालगत असलेल्या शेततळ्यात आढळून आले. वरुड येथील कोनड रोडवर रहिवासी असलेल्या जोशी कुटुंबीयातील यश अनिल जोशी (14) दिपाली रमण जोशी (9) रोहन रमण जोशी (7 ) यांचा मृतात समावेश आहे.
घटनेती तिन्ही मुले सोमवारी सकाळी 10. 30 वाजताच्या सुमारास महादेव मंदिर डोलखेडा रोड या ठिकाणी दर्शनासाठी जातो असे सांगून घरातून गेले होते. दरम्यान शेतातील घराजवळ असलेल्या एका शेततळ्यात पोहण्यासाठी ते गेले असावेत. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला. पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. यातील यश अनिल जोशी हा मुलगा खामगाव येथे शिक्षणासाठी असतो दरम्यान उन्हाळ्यात सुट्टी असल्याने तो वरुड येथे आला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.