झाड कोसळून गाड्यांचे नुकसान

| कर्जत | प्रतिनिधी |

माथेरान येथील पर्यटकांसाठी असलेल्या वाहनतळावर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आलेल्या तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

माथेरान मध्ये येणाऱ्या पर्यटकांना आपली वाहने दस्तुरी येथे पार्क करावी लागतात. माथेरान हे इको सेन्सेटिव्ह झोन असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वृक्ष तोड होत नाही. त्यामुळे माथेरानमध्ये असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून झाडे उभी आहेत. त्यामुळे पर्यटकांना आपली वाहने झाडांखाली पार्क करावी लागतात. परंतु, मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडत होती. त्यातच वाहनतळावरील जुनी झाडे कोसळण्याची घटन घडली आहे. त्यात एरटिका, होंडा सिटी व स्कॉर्पिओ अशा तीन गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, अन्य गाड्यांचे देखील थोडेफार नुकसान झाले आहे.

Exit mobile version