| रसायनी | प्रतिनिधी |
वाशिवली गावाच्या हद्दीत प्रतिबंधित गांजा सिगारेटमध्ये भरून त्याचे सेवन करताना दोन जण आढळून आल्याने रसायनी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 7) रात्री करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिवली गावाच्या हद्दीतील डॉ. पारनेरकर महाराज हायस्कूलच्या उत्तर बाजूस असलेल्या गोकळ्या पटांगणात रात्री 9.14 वाजण्याच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वर बाव्यजी जाधव (76, रा. वाशिवली, ता. खालापूर, जि. रायगड) आणि साबर विनायक जाधव (26, रा. वाशिवली, ता. खालापूर, जि. रायगड) हे प्रतिबंधित गांजा सिगारेटमध्ये भरून ओढत असताना आढळून आल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची फिर्याद पोलीस कर्मचारी शशांक श्यामकांत पिंगळे (41) यांनी दिली आहे. गुन्हा 7 ऑक्टोबर रोजी रात्री 11.21 वाजता दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.
रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करीत आहेत. या कारवाईमुळे वाशिवली परिसरात अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
वाशिवलीत गांजा सेवनप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
