बैलाची कत्तल केल्याप्रकरणी गुन्हा

| पनवेल | प्रतिनिधी |

बैलाची कत्तल करून तीन बैलांना बेशुद्ध केल्याप्रकरणी तळोजा गावातील सोहेल रियाज काझी, अकिब दावलकर आणि बिलाल गुलाम मोहम्मद आणि इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेंधर फाटा रेल्वे पुल आणि एल.अँड.टी.चे काम सुरू असलेल्या इमारतीच्या दरम्यान एका भंगारच्या दुकानाच्या मागे शेडमध्ये सोहेल, दावलकर, बिलाल आणि आणखी दोन जणांनी बैलाची कत्तल केली आणि इतर तीन बैलांना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले होते. या प्रकाराची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्यातील दोघे जण त्या ठिकाणाहून पळून गेले. या प्रकाराची माहिती तळोजा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version