| पनवेल | वार्ताहर |
दोन अनोळखी व्यक्तींनी दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून दुकानातील काऊंटरमधून रोख रक्कम लंपास केल्याची घटना ओरियन मॉलमध्ये घडली आहे. येथील अमुक्ती शॉपमध्ये दोन अनोळखी व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व एक महिला ग्राहक बनून दुकानात आले. त्यापैकी मुलीने दुकानातील कर्मचार्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. तिच्याबरोबर असलेल्या मुलाने दुकानातील कॅश काऊंटमध्ये ठेवलेली 20 हजार रुपये रोख रक्कम लबाडीने चोरली आणि ते तेथून पसार झाले. त्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.