| पनवेल | वार्ताहर |
शहरातील शिवशंभो नाका येथे एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. दुचाकी मालकाने येथील न्यू पंजाब हॉटेल समोर उभी करून ठेवलेली होती. त्याठिकाणाहून एका चोरट्याने चोरून नेली आहे. दिनेश राजानी असे दुचाकी मालकाचे नाव असून त्यांची होंडा कंपनीची अॅक्टीव्हा गाडी होती. ती साधारण 20 हजार रुपये किंमतीची गाडी असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.