। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील जीवनधारा सामाजिक संस्थेच्यावतीले वरसगाव-कोलाड येथे दि.9 व 10 मे रोजी दोन दिवसीय समर कॅम्प मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमासाठी 10 आदिवासी वाड्यांमधून सुमारे 100 मुलांनी उपस्थिती दर्शवून शिबिराची शोभा वाढविली. तर, करूणा गोळे यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवून मुलांकडून करून घेतले. तसेच, विभा चोरगे व डॉ. ऋचा वागले यांनी दातांचे आरोग्य योग व प्राणायम याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या शिबिरात क्रिकेट, लगोरी, सापशिडी, बुद्धिबळ, कॅरम, पाय बॉल, लुडो अशा प्रकारे विविध खेळ घेण्यात आले.
दुसर्या दिवशी सुवर्णा वेदक व सावित्री वाघमारे यांनी योगा सेक्शन घेतले. मुलांनी आपापले अनुभव देखील कथन करून सांगितले. त्यानंतर मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात समर कॅम्प पार पाडण्यात आला. शेवटी मिनोती करकरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून या शिबिराची यशस्वी सांगता करण्यात आली.