। उरण । वार्ताहर ।
सध्या घाटमाथ्यावरील पुणे, जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे या जिल्ह्यांमध्ये गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना लम्पी स्कीन या संसर्गजन्य त्वचा रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील पशुपालकांनी सावधगिरी बाळगून सतर्क राहावे, असे आवाहन उरण तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल धांडे यांनी केले आहे.

सध्या या त्वचारोगाचा प्रसार चार पाच जिल्ह्यात असला तरी त्याचा प्रसार आपल्या उरण परिसर व रायगड जिल्ह्यात होऊ नये म्हणून पशुपालकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे डॉ. अनिल धांडे यांनी सूचित केले. जर पशुपालकांना या रोगाची लक्षणे दिसून आली, तर तर घाबरून न जाता तालुका पशुसंवर्धन अधिकारी, डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. धांडे यांनी केले आहे.