। कोर्लई । वार्ताहर ।
शासनाच्या स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानांतर्गत मुरुड़ तहसील व काशिद ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार रोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिद समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, पाच टन कचरा गोळा करुन त्याची योग्य ती विल्हेवाट लावून किनारा चकाचक करण्यात आला.
या मोहिमेत तहसीलदार रोहन शिंदे, नायब तहसीलदार रवींद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष वाणी, नांदगाव मंडळ अधिकारी, तलाठी (नांदगाव), महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे सहाय्यक बंदर निरीक्षक महेश होले, यशोधन कुलकर्णी, काशिद ग्रामपंचायत सरपंच नम्रता कासार-खेडेकर, सदस्य संतोष राणे, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख तथा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुका अध्यक्ष भरत बेलोसे, सुनील दिवेकर, भिकेश दिवेकर, अमित खेडेकर, हेमंत चाळके, शरद बेलोसे, उमेश कासार, शैलेश खोत, पोलीस पाटील समृद्धी राणे, काशिद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सूर्यकांत जंगम, प्रशांत खेडेकर कर्मचारी वृंद सहभागी झाले होते.
यावेळी काशिद समुद्रकिनार्यावरील रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या, जाळी आदी पाच टन कचरा गोळा करण्यात येऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.