। श्रीवर्धन । वार्ताहर ।
गालसुरे परिसरात भरधाव वेगाने जाणार्या कारच्या धडकेत म्हैस व रेडा या गुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या गुरांचा गुराखी गंभीर जखमी झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गालसुरे ते श्रीवर्धन मार्गावर फारुख रजाक डायनजी (47) हा आरोपी त्याच्या ताब्यातील कार (क्र.एमएच.06.एफ.2133) वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेदरकारपणे चालिवत होता. दरम्यान, याच मार्गावरुन गुराखी भरत कांबळे हे म्हैस व रेडा या गुरांना घेवून जात असताना गालसुरे कृषी विद्यापीठासमोर या भरधाव कारची धडक गुरे आणि गुराखी यांना बसली. या धडकेत कारचेही नुकसान झाले.
याप्रकरणी मोहन कांबळे यांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, घटनेतील आरोपी चालकावर गुनहा नोंदविण्यतात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश रसेडे करीत आहेत.