उरणमध्ये गुरे चोरणारी टोळी सक्रिय

| उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणात गुरे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस यंत्रणा लक्ष केंद्रित करत नसल्याने शेतकरी नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी महेश म्हात्रे यांनी माहिती देताना सांगितले की, ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी हे शेतीच्या कामासाठी, बैलगाडीसाठी व दुध उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात गुरांचे, गाईचे पालन पोषण करत आहोत. परंतु मागील काही महिन्यांपासून रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत अज्ञात व्यक्तींकडून गोठ्यातील गुरे, गाई चोरीस जाण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यासंदर्भात पोलीसाना सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले आहेत. शेतकर्‍यांनी या संदर्भात न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न आम्हा शेतकर्‍यांसमोर उभा राहिला आहे.

Exit mobile version