पो.नि. अशोक थोरात यांचे आवाहन
| रेवदंडा | वार्ताहर |
गणेशोत्सवात काही दिवस बाकी असून, तो शांततेने व सुरक्षितपणे पार पाडा, असे आवाहन रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक थोरात यांनी आयोजित सभेत उपस्थितांना संबोधीताना केले.
यावेळी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी, ग्राम रक्षक दल, सागर सुरक्षा दल, पोलिस पाटील, पत्रकार, समाज अध्यक्ष, तंटामुक्त कमिटी अध्यक्ष, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते.
गणेशोत्सवामध्ये गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन या दिवशी रेवदंडा पारनाका येते होत असलेल्या वाहतूक कोंडीपासून सुरक्षितता म्हणून चौल नाका व मोठे बंदर येथून रेवदंडा बाजारपेठ रस्ता वाहतुकीसाठी सायकांळी बंद ठेवावा व वाहतूक रेवदंडा बायपास मार्गाने वळवावी, अशी सूचना सुहास घोणे यांनी मांडली. याबाबत अशोक थोरात यांनी नियोजन करण्याचे आश्वासन दिले.