मिरजोळीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

। चिपळूण । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिपळूण अंतर्गत गरुडझेप महिला प्रभाग संघ व महिला ग्रामसंघ मिरजोळीतर्फे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्या व रत्नागिरी जिल्हा बँक संचालक दिशा दाभोळकर यांच्या उपस्थितीत मिरजोळी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मिरजोळीमधील सर्व महिला बचत गट, ग्रामपंचायत सदस्य विनोद पवार, तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश चव्हाण व इतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांतर्फे दिशा दाभोळकर यांस वाढदिवसाच्या तसेच महिला दिनाच्या शुभेच्छादेखील देण्यात आल्या.

Exit mobile version