| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आज दिनांक 08 मार्च 2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड येथे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व महिला मंत्रालयीन स्टाफ, महीला पोलीस अधिकारी/अंमलदार व अंशकालीन महिला सफाई कामगार उपस्थित होत्या.
सदर जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी 09:45 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथुन रायगड जिल्ह्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये 70 रायगड महिला पोलिसांचा सहभाग होता. सदर वेळी पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपाधीक्षक (गृह) जगदीश काकडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग सोनाली कदम यांची उपस्थिती होती.
आजच्या महिला दिनानिमित्त रायगड महिला पोलीस यांच्यासाठी पोलीस मुख्यालय अलिबाग येथील जंजिरा हॉल येथे टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथील डॉ.प्रतिभा पाटील, डॉ. सुजाता पाटील यांनी महिलींना होणाऱ्या कर्करोग, स्तनाचा व गर्भशयाचा कर्करोग रोगांबाबत तसेच कर्करोग पूर्व तपासणी प्रशिक्षणाबाबत 75 महिलांना यांना मार्गदर्शन केले. महिलांनी त्यांच्या काही समस्या मांडल्या असता त्यांना डॉ.प्रतिभा पाटील यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.
जागतिक महिला दिनानिमित्त रायगड महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी, कार्यालयीन शिपाई, तसेच अंशकालीन महिला सफाई कामगार तसेच दिशा पॅथॉलॉजी, अलिबाग यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एकुण 60 महिला पोलिसांची रक्त तपासणी करण्यात आली .जागतिक महिला दिनानिमित्त रायगड महिला 01 पोलीस अधिकारी व 11 महिला पोलीस अंमलदार तसेच 02 मंत्रालयीन कर्मचारी, 11 कार्यालयीन शिपाई, तसेच 04 अंशकालीन महिला सफाई कामगार यांना त्यांचे उत्कृष्ट कामगिरीबाबत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे वेळी पेालीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक, अतुल झेंडे, पोलीस उप-अधीक्षक गृह, जगदिश काकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अलिबाग विभाग सोनाली कदम महिला पोलीस निरीक्षक, सुवर्णा पत्की व पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच मंत्रालयीन महिला अधिकारी/कर्मचारी हे उपस्थित होते.