। अलिबाग । प्रतिनिधी ।
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त रविवार दि.15 रोजी स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतीक मंच व प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका ग्रंथालय-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या को.म.सा.प. अलिबागच्या उपाध्यक्षा निर्मला फुलगावकर यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी मंचाचे अध्यक्ष सखाराम पवार, मंचाचे कार्यवाह नागेश कुळकर्णी, माजी नगरसेवक आर. के. घरत, कोमसापचे सहकार्यवाह नंदु तळकर, ज्येष्ठ साहित्यीक शरद कोरडे, ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षा चारुशीला कोरडे, मुश्ताक घट्टे, सतीश लोंढे, पुरुषोत्तम साठ्ये, ऋती बोंद्रे, संध्या कुलकर्णी, ॲड. राजेंद्र जैन, अमुलकुमार जैन, विकास पाटील, जिल्हा रुग्णालयाचे हेमकांत सोनार, समंत बोंद्रे, झेबा कुरेशी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश कुळकर्णी यांनी केले. तर, आभार प्रदर्शन मंचाचे उपाध्यक्ष शरद कोरडे यांनी केले.
पुस्तक वाचन प्रेरणा दिन साजरा
