। पनवेल । वार्ताहर ।
प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे-पनवेल तर्फे 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल बनकर यांनी केले. यावेळी गौतम अहिरे बापू सावंत, राजेंद्र घोडके, दिगंबर साळवे, महादेव कांबळे, यशपाल कांबळे, गणेश डोळस, धनंजय ताटे, प्रविण ढगे, अर्जुन भगत, नितीन कांबळे, सचिन सोनावणे, प्रदिप वाघमारे, मुकूंद सोनावणे, कमलाकर कांबळे, आर. डी. गमरे, स्वप्नील पवार, अनिकेत लोंढे, नितीन जाधव, दर्शक सावंत, उज्वला सोनावणे, शैला सोनावणे, आरती लोंढे, नैना देव्हारे, सविता सावंत आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष परिश्रम घेतले. यावेळी करंजाडे मधील धम्मबांधव व भगिनी यांचा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न
