। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पनवेल येथील कार्यालयात उपविभागीय अभियंता जनार्दन कुलकर्णी यांची करंजाडे कॉलनी वेल्फेअर असो.च्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. यावेळी, त्यांच्यासमोर पाण्याविषयीच्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. करंजाडे नोडला जास्तीत जास्त एम.एल.डी. पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, करंजाडे नोडला सकाळ व संध्याकाळ असे दोनवेळा पाणी सोडावे, अशी सविस्तर चर्चा करून विनंती करण्यात आली. ही मागणी करंजाडे नोडमधील वाढत्या लोकसंख्येमुळे अत्यंत रास्त आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले आहे. तसेच, लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सिडकोला करंजाडेकरांसाठी मुबलक व व्यवस्थित पाणी देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी, करंजाडे नोडचे पोलीस पाटील कुणाल लोंढे, करंजाडे कॉलनी वेल्फेअर असो.चे अध्यक्ष चंद्रकांत गुजर व सहसचिव वसंत सोनावणे उपस्थित होते.