पारंपारिक पद्धतीने नारळी पौर्णिमा साजरी

| आगरदांडा | वार्ताहर |

समुद्राकाठी राहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधवासह शहरातील नागरिकांच्यावतीने सजवलेल्या सोन्याच्या नारळाची पुजा करून भव्य मिरवणूक लक्ष्मीखार येथील बापदेव मंदिरापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत काढण्यात आली. तद्नंतर सोन्याच्या नाराळाची पुजन व आरती करुन दर्या राजाला सोन्याचा नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी मुरुड शहरात व कोळीवाड्यात आनंदाचे वातावरण पसरलेले पाहायला मिळत होते.

यावेळी अविनाश दांडेकर, प्रमोद भायदे, महेश भगत, संदिप पाटील, प्रकाश राजपुरकर, अनंत पाटील, किर्ती शहा, रूपेश जामकर, पुजारी- कोतवाल, विजय सुर्वे, पांडुरंग आरेकर, मंगेश दांडेकर, मोहन करंदेकर, अरविंद गायकर, प्रविण बैकर, आदेश दांडेकर, अच्युत पोतदार, निलेश राजपुरकर, दिपक राजपुरकर, नयन कर्णिक, अशोक कमाने, अजित गुरव आदिंसह समाज पाखाडी अध्यक्ष व मान्यवर यावेळी उपस्थित होते. तर, यावेळी मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील, सहाय्यक फौजदार-दिपक राऊळ, पोलीस शिपाई-विक्रांत बांधणकर, पोलीस शिपाई-कैलास डिमसे आदिंसह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Exit mobile version