। माणगाव । प्रतिनिधी।
माणगाव येथील जे.बी. सावंत एजुकेशन सोसायटीच्या टिकमभाई मेथा वाणिज्य विद्यालयात मंगळवारी (दि.24) राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील राष्टीय सेवा योजना विभागाच्या 90 विध्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागाविषयी सविस्तर माहिती प्राचार्य हर्षल जोशी यांनी दिली. तसेच, कार्यक्रम अधिकारी जगदीश शिगवण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे अनेक समाज उपयोगी कामे केली जातात. यामध्ये रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम, एडस जनजागृती, नवमतदार नोंदणी, रस्ता सुरक्षा अभियान, विविध शैक्षणिक उपक्रम, निवासी शिबिर, प्लास्टिक मुक्त भारत रॅली, पथनाट्य याद्वारे जनजागृती केली जाते. यावेळी अशोक मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व व युवकांची भूमिकेबद्दल आपले विचार मांडले. डॉ. नितीन मुटकुळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हि एक संधी असून केवळ 10 मार्कांसाठी यामध्ये सहभाग न घेता समाज सेवा करण्यासाठी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन सर्व विध्यार्थ्यांना केले.