। माणगाव । प्रतिनिधी ।
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाकरिता प्रतिवर्षी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणार्या गौरीशंकर मिठाईवाले परळ-मुंबई यांच्याकडून यावर्षीही मंगळवारी (दि.24) 3 हजार 500 वह्यांचे वाटप सप्टेंबर करण्यात आले. कृष्णा महाडिक यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी रायगड जिल्ह्यातील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याची मदत देण्यात येते. यावर्षीही प्रसिद्ध मिठाईवाले गौरीशंकर मिठाईवाले यांच्याकडून दक्षिण रायगड जिल्ह्यातील 24 शाळांमध्ये 3 हजार 500 विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पूष्कराज सूर्यवंशी, मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे तसेच तळा, माणगाव, रोहा, म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यातील 24 विद्यालयांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.