। अलिबाग । प्रतिनिधी ।
गोंधळपाडा शाळेच्या मुख्याध्यापिका प्राची राजन ठाकूर यांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाल्याने त्यांना गोंधळपाडा शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने निरोप देण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवारी (दि.24) पार पडला. या निरोप समारंभासाठी गोंधळपाडा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शाळेतील शिक्षक, वेश्वीतील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्राची ठाकूर यांना गणेश प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक तसेच व शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वारगे यांनी, तर दिपक पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कविता गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी रश्मी राऊत यांनी मनोगत व्यक्त केले आणि कार्यक्रमाची सांगता साली.