सखाराम पवार यांचा 89 वा वाढदिवस साजरा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व श्रीपंत वाड्मय अभ्यासक सखाराम पवार यांचा 89 वा वाढदिवस 7 जानेवारी रोजी घरगुती स्वरुपात साजरा करण्यात आली. याप्रसंगी 90 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांना मित्रपरिवार, स्नेही, हितचिंतक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे सावट असल्याने पवार यांचा 89 वा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी साधेपणाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश म्हात्रे, प्राची म्हात्रे, उमाजी केळुसकर, शरद कोरडे, चारुशीला कोरडे, बळवंत वालेकर, उल्हास पवार, विकास पाटील, सुप्रिया पाटील, सात्विक पाटील, सुनील पाटील, गंधार पाटील, हेमकांत सोनार, विनोद टेंबुलकर, मुश्ताक घट्टे, अल्ताफ घट्टे, संजय कांबळे, अ‍ॅड. राजेंद्र जैन, मनोहर कदम, श्रीधर पाटील सुनंदा पवार,बाळू पवार, अ‍ॅड. संतोष पवार, अमोघ किंजवडेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version