हाशिवरे विद्यालयात संस्कृत दिन साजरा

। हाशिवरे । वार्ताहर ।

महात्मा गांधी विद्यालय हाशीवरे येथे सोमवारी (दि. 19) संस्कृत दिन साजरा करण्यात आला. सूत्रसंचालनापासून ऋणनिर्देशपर्यंत सर्व कार्यक्रम संस्कृतमध्येच संस्कृत अध्यापक श्री ज्ञानेश्‍वर विठ्ठल कुलकर्णी यांनी बसविले होते.

संस्कृत भाषेचे महत्त्व, कोल्ह्याला द्राक्ष आंबट हे संस्कृतमध्ये गाणे व त्यावर नृत्य, संस्कृतमध्येच विक्स गोळी आणि पार्ले जी बिस्कीटची जाहिरात, ईशस्तवन स्वागत पद्यंसुद्धा संस्कृतमध्येच बसविण्यात आले होते. हे संस्कृत दिनाचे 21 वे वर्ष असून श्री कुलकर्णी सरांनी मनोगत व्यक्त करताना संस्कृत भाषा ही सर्व भारतीय भाषांची जननी असून संस्कृत सुभाषितांमुळे सुसंस्कारित पिढी निर्माण होते. तसेच संस्कृत भाषा बोलल्यामुळे आचार विचार आणि उच्चार यात नक्कीच सुधारणा होते, असे प्रतिपादन केले.

Exit mobile version