नील हॉस्पिटलमध्ये योग दिवस साजरा

। पनवेल । वार्ताहर ।

नवीन पनवेल येथील नील हॉस्पिटल येथे गर्भवती महिला व इतरांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले. अनेक गर्भवती महिला व इतरांनी या योग शिबिराचा आनंद घेतला.

प्रसिद्ध स्त्रीरोग व गर्भ संस्कार तज्ञ बीके डॉ. शुभदा नील यांनी गर्भवती महिला व सर्वांकडून संगीतमय योग व मेडिटेशन करवून घेतले. तसेच, फादर्स डे साजरा करताना त्यांनी सर्वांना विश्‍व पिता परमात्म्याचा परिचय दिला. आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. या वर्षी 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. नील हॉस्पिटल येथे दर शनिवारी संध्यकाळी 5 ते 6, तर रविवारी 3 ते 4 या वेळात योग शिबीर. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत गर्भसंस्कार, मेडिटेशन शिबीर मोफत घेण्यात येते. या मोफत योग, मेडिटेशन व गर्भसंस्कार शिबीराचा लाभ जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी व इतरांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. शुभदा नील यांनी केले आहे.

Exit mobile version