जिजाऊ मासाहेबांची 348 वी पुण्यतिथी साजरी

महाड | वार्ताहर |
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील जिजाऊ साहेबांची 348वी पुण्यतिथी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नियमांचे पालन करत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगीता पारधी, महाड पं.स. सभापती सपना मालुसरे, संपर्कप्रमुख विजय सावंत, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, मनोज कालीजकर, बाळ राऊळ, रघुवीर देशमुख, राजू खातू यांच्यासह शिवभक्त तसेच ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

यावेळी आमदार गोगावले यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले, की जिजाऊ मासाहेबांचा 350 वी पुण्यतिथी कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे, तसेच जगात आलेली ही महामारी लवकरात लवकर बरी होवो, अशी जिजाऊ चरणी प्रार्थना केली.

Exit mobile version