घोणसे घाटात सिमेंट ट्रकला भीषण अपघात; चालक गंभीर जखमी

एकाच जागी तिसऱ्या अपघाताची नोंद
। म्हसळा । वार्ताहर ।

पंधरा दिवसाच्या दरम्यान घोणशे घाटात एकाच ठिकाणी तिसरा अपघात झाला असून एकाच ठिकाणी होणारा हा तिसरा अपघात असून या बाबतसंबंधित खात्याकडून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याची चर्चा ऐकावयास मिळते. पंधरा दिवसापूर्वी एका खाजगी बसला याच ठिकाणी ब्रेक फेल झाल्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला होता तर सुमारे २० ते २५ जण गंभीर जखमी झाले होते. त्याच ठिकाणी आज दिनांक २४ मे रोजी सिमेंटनी भरलेल्या ट्रकचा उतारातील वळणावर ब्रेक न लागल्याने भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात चालक गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची घटना घडली आहे. दिनांक २४ मे रोजी MH ०५ AM ३२०२ या क्रमांकाचा ट्रक तुर्भे येथून अल्ट्राटेक कंपनीचा सिमेंट घेऊन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली येथे जात होता. हा ट्रक घोणसे घाटातील एक घातक वळणावर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक फेल होऊन हा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल.

Exit mobile version