| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
तळोजा सेक्टर 36 सुखसागर सोसायटीच्या 10 माळ्यावर आज मंगळवारी (दि.15) सुमारे तीनच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये जीवितहानी झाली नसली तरी दहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले होते. आगीचे नेमके कारण कळले नसून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्न केले. या आगी नंतर कळंबोली तसेच खारघर अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले. तळोजा खारघरला लागून असलेले हे शहर या शहराची झपाट्याने वाढवत आहे. सिडकोचे गृहप्रकल्प या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उभे केले जात आहेत. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अग्निशमन यंत्रणा सज्ज असलेले अग्निशमन केंद्र नसल्याने नागरिकांकडूनही अग्निशमन यंत्रणेची वारंवार मागणी होत आहे. सिडको ने वसवलेले प्रमुख शहरांपैकी तळोजा हे भविष्यातील अत्याधुनिक शहर म्हणून ओळखले जाऊ लागत आहे. मात्र, या शहरांमध्ये सोयी सुविधांचा वनवा पाहायला मिळत आहे. या परिसरात सिडको मार्फत मोठ्या घरकुल योजना अंतर्गत घरे उभे केले जात आहेत. मात्र, या ठिकाणची अग्निशामक यंत्रणा चालू नसल्याचे येथील रहिवासी यांनी सांगितले. या सर्व प्रकाराबाबत तळोजा विभागात अग्निशामक केंद्र उभारण्याची मागणी तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी केलेली आहे.