मेंदडी येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद

। म्हसळा । वार्ताहर ।
म्हसळा तालुक्यातील मेंदडी केंद्राची शिक्षण परिषद राजिप केंद्रशाळा मेंदडी येथे पार पडली. सदर शिक्षण परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी तहसिलदार समीर घारे, गटशिक्षणाधिकारी तथा सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कदम, मंडळ अधिकारी उभारे, विस्तार अधिकारी अनिल ठाकूर, सलाम कौचाली, संदीप भोनकर, किशोर पैलकर आदी उपस्थित होते.
या शिक्षण परिषदेत विद्यार्थी गुणवत्ता विकास, स्वाध्याय उपक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, गणित व विज्ञान पेटी मार्गदर्शन, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, शाळा सिद्धी, सरल, शाळाबाह्य विद्यार्थी इत्यादी विषयावर विस्तार अधिकारी अनिल ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास कळस, शशिकांत भिंगारदेवे, लक्ष्मण चिकाटी, दिनेश पाटील, सुधाकर गायकर, अब्बास शेख, शिवाजी चव्हाण, नदिमोद्दिन सय्यद, विश्‍वास काणेकर, गीतांजली भाटकर, सायली बीर्जे, सोनाताई शिंदे, शबाना जलगावकर, तबस्सुम कोंडविलकर, प्रविण सोनवणे, नरेश गायकवाड आदी शिक्षकांनी सहकार्य केले.

Exit mobile version