सीईटी प्रवेशाची वेबसाईट हँग

पालक व विद्यार्थी संभ्रमात
उरण | वार्ताहर |
अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा मात्र बंधनकारक करण्यात आली आहे. सीईटीचे अर्ज भरण्यासाठीची हँग झाली आहे. दहावीचा निकाल लागला त्यावेळीही वेबसाईट हँग झाली होती. आता पुन्हा सीईटीसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट हँग झालेली असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.
वेबसाईट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरता हिरमोड झालेला आहे अकरावी वर्गात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे.
या सीईटीचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक केंद्रावर गर्दी केली आहे. मात्र, सीईटीचे अर्ज भरण्याची वेबसाइट हँग झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाही. या वेबसाईटवर तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तात्पुरत्या वेळेसाठी बंद करण्यात आले आहे, असा मेसेज दिसत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
सीईटीसाठी अर्ज करण्याची मुदत 26 जुलैपर्यंत आहे. मुदत संपण्यास अवघे 2 दिवस उरले असतानाही वेबसाईट सुरू होत नाही. त्यामुळे नक्की काय करायचे अशा संभ्रमात पालक व विद्यार्थी सापडले आहेत. तरी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात लक्ष घालून तो निकाली काढावा अन्यथा वेबसाईट त्वरित सुरू करण्याची मागणी पालक वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version